‘सानपाडा प्रिमियर लीग'चा विजेता अशोक स्मृती संघ; विधीशा चॅलेंजर उपविजेते

‘सानपाडा प्रिमियर लीग'चे ६वे पर्व उत्साहात संपन्न

नवी मुंबई ः सानपाडा मधील तरुणाई आणि क्रीडा रसिकांची सर्वाधिक पसंतीची ‘सानपाडा प्रिमियर लीग-६ वे पर्व' २८ आणि २९ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ‘सानपाडा प्रिमियर लीग'च्या ६व्या पर्वाच्या विजेतपदाचा मान अशोक स्मृती संघाने पटकावला. तर स्पर्धेत उपविजेतेपद विधीशा चॅलेंजर या संघाने मिळविले. विजेत्या अशोक स्मृती संघाला रोख ३५ हजार रुपये आणि स्व.तुकाराम रामदास ठाकूर स्मृती चषक तर उपविजेत्या विधीशा चॅलेंजर संघाला रोख २५ हजार रुपये आणि स्व.दिपीका अमोल वास्कर स्मृती चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

‘सानपाडा प्रिमियर लीग'चे उद्‌घाटन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, माजी नगरसेवक बाळाराम पाटील, सोमनाथ वास्कर, ‘गायत्री चेतना केंद्र'चे मुन्नाभाई पटेल, आयोजक माजी नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर, उद्योजक शंकर पाटील, वासुदेव पाटील, दिलीप मढवी, काशीनाथ वास्कर, कमळाकर पाटील, शांताराम ठाकूर, आदिंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तर पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, शहरप्रमुख विजय माने, सौ. कोमल वास्कर, सोमनाथ वास्कर, बळीराम वास्कर, शत्रुघ्न पाटील, आदि उपस्थित होते. तर स्पर्धा समयी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, मिलिंद सुर्यराव, साईनाथ बुवा  पाटील, हरिद्वार शांतीकुज येथील गायत्री परिवाराचे मनिष महाराज, डॉ. भूषण जैन, विभागप्रमुख सुनिल गव्हाणे, उपविभागप्रमुख संदेश चव्हाण, गणेश मानकर, आदिंनी उपस्थिती दर्शविली.

‘सानपाडा प्रिमियर लीग-६'साठी माऊली युनिमर्स (साईनाथ मढवी), विधीशा चॅलेंजर्स (विलास पाटील), ૐ श्री बिल्डर्स  (रोशन पाटील), भावेश स्मृती (गणेश वास्कर, निकेश वास्कर), स्व.फकीत होण्या प्रतिष्ठान (माया ट्रेडर्स, श्री दत्त मसाला मिल), स्व.अशोक स्मृती (प्रदीप ठाकूर, रुपेश ठाकूर, संतोष ठाकूर), पाल्म फायटर (अंकीत पाटील, देवेंद्र पाटील), थ्री इन वन ( श्रीनिवास गुप्ता, संजय डाकवे, अंकुश घावटे) अशा आठ संघांच्या माध्यमातून लिलाव पध्दतीने खेळाडू घेण्यात आले होते. यामध्ये ४० प्लस क्रिकेट मधील खेळाडुंना प्राधान्य देण्यात आले.

स्पर्धेत मालिकावीर म्हणून प्रमोद पाटील (स्व.विजय जनार्दन दळवी स्मृतीचषक), उत्कृष्ट फलंदाज विशाल रोकडे (स्व.जगदीश नरसिंग ठाकूर स्मृतीचषक), उत्कृष्ट गोलंदाज आकाश बनसोडे (स्व.त्रिभुवन जोमा वास्कर स्मृतीचषक), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सागर घाडगे (स्व.धर्मराज दत्तू ठाकूर स्मृतीचषक) सागर घाडगे तर उत्कृष्ट ४० प्लस फलंदाज  मिलिंद पाटील (स्व.प्रमिला पांडुरंग मढवी स्मृतीचषक) आणि अंतिम सामना सामनावीर म्हणून सागर घाडगे यांना गौरविण्यात आले. सदर सर्व पारितोषिके माजी नगरसेविका सौ. कोमल वास्कर यांच्या वतीने देण्यात आली.

दरम्यान, संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन भानुदास ठाकूर, निखील पाटिल, प्रल्हाद ठाकूर, हेमंत दळवी, अरविंद ठाकूर यांनी केले. तर शिवसेना विभागप्रमुख आशिष वास्कर, पवन मोढवे, प्रसाद गोंधळेकर यांनी विशेष सहकार्य केले.

Read Previous

6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान नवी मुंबई कोपरखैरणे येथे रंगणार एनएमपीएलचा थरार

Read Next

सुयोग स्मृती चषक २०२३  या चषकावर साईनाथ दिवा संघाने कोरले नाव