शिक्षकांनी सादर करण्याच्या टीचिंग रिसोर्स या विभागातून वैष्णवी मोडक यांचा प्रकल्प सर्वप्रथम

वैष्णवी मोडक यांचा मल्टीपर्पज स्केल हा प्रकल्प महाराष्ट्रात प्रथम  

नवी मुंबई : रिलायन्स फाउंडेशन स्कूलच्या विज्ञानाच्या शिक्षिका वैष्णवी मोडक यांचा मल्टीपर्पज स्केल अर्थात जादूची पट्टी हा प्रकल्पाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिज्ञासा कॉम्पिटिशन २०२२-२३ यामधून शिक्षकांनी सादर करण्याच्या टीचिंग रिसोर्स या विभागातून वैष्णवी मोडक यांचा प्रकल्प सर्वप्रथम आला आहे.  

मल्टीपर्पज स्केलच्या माध्यमातून वैष्णवी मोडक यांनी रासायनिक समीकरणे संतुलित करणे, लॉ ऑफ कॉन्सर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शनालिटी, हाऊ टू आयडेंटिफाय प्रॉडक्ट तसेच वन मोल ही कन्सेप्ट मांडली होती. आभासी पद्धतीने या प्रकल्पाचे सादरीकरण मोडक यांनी केली. यावेळी उपस्थित परीक्षकांनी त्यांच्या या प्रकल्पाला जादूची पट्टी अशी उपमा दिली. आतापर्यंत वैष्णवी मोडक यांचे सॅनिटरी नॅपकिनमुळे होणाऱया कचऱयाचे व्यवस्थापन, कर्जत तालुक्यातील मातीचे परीक्षण, विविध ऋतूंच्या हवामानाचा गाई म्हशींच्या दुधावर होणारा परिणाम आणि पेशी एक मूलभूत घटक आदि प्रकल्पांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला. त्यात आता आणखीन एका प्रकल्पाची भर पडली.  मोडक यांना मिळालेल्या या यशाचे कौतुक मा. प्राचार्य डॉ.सुहास सबनीस, रिलायन्स फाउंडेशन स्कूलचे पदाधिकारी आणि शालेय समितीचे अध्यक्ष आशू गर्ग यांनी विशेष कौतुक केले.   

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

तळमळ एका अडगळीची बालनाट्य नवी मुंबई केंद्रातून प्रथम