याहीवर्षी नवी मुंबई महापालिकेच्या ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती संपादन

शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळेतील ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत  झळकले

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये याहीवर्षी नवी मुंबई महापालिकेच्या ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती संपादन करीत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.

यंदा ३१ जुलै २०२२ रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये महापालिकेच्या शाळांतून इयत्ता पाचवीचे ५०९ आणि इयत्ता आठवीचे ४५३ असे एकूण १०६२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. त्यामधून इयत्ता पाचवीच्या ४९ आणि इयत्ता आठवीच्या ११ विद्यार्थ्यांनी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती पटकावित नवी मुंबई महापालिका शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचा उंचावलेला स्तर सिध्द केला आहे. सदर गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षण विभागामार्फत अभ्यास सहल आयोजित करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेच्या वतीने प्रति विद्यार्थी ६०० रुपये इतकी प्रतिमहा प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घ्ोतल्या जाणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत अदा करण्यात येते. या परीक्षेकरिता मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांसाठीही महापालिका शिक्षण विभागातर्फे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके, मार्गदर्शके तसेच सराव प्रश्नपत्रिका विदयार्थ्यांना महापालिका मार्फत उपलब्ध करुन देण्यात येतात. शिष्यवृत्ती परीक्षेकरिता विद्यार्थ्यांची तयारी करुन घ्ोण्यासाठी शाळांमधील शिक्षकांमार्फत अतिरिक्त जादा तासिकांचे नियोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यांसाठी तज्ञ मार्गदर्शकांद्वारे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात आले. त्यासोबतच शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले.  

यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या तसेच खाजगी शाळांतील इयत्ता पाचवीचे १७९३ आणि इयत्ता आठवीचे १४५९ असे एकूण ३२५२ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये महापालिकेच्या शाळांतून इयत्ता पाचवीचे ५०९ आणि इयत्ता आठवीचे ४५३ असे एकूण १०६२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता प्रविष्ट झाले होते. त्यात महापालिका शाळांतील इयत्ता पाचवीच्या ४९ आणि इयत्ता आठवीच्या ११ अशा एकूण ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केलेली असून त्यामध्ये शाळा क्रमांक ४२, घणसोली येथील सर्वाधिक म्हणजे इयत्ता पाचवीचे २४ आणि इयत्ता आठवीचे ८ असे एकूण ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शिक्षकांनी सादर करण्याच्या टीचिंग रिसोर्स या विभागातून वैष्णवी मोडक यांचा प्रकल्प सर्वप्रथम