शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन जाहीर

विद्याभवन शिक्षण संकुलातील 31 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड  

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतून पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील 31 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनिल रेडेकर, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, माजी कार्याध्यक्ष प्रा.कृ.ना. शिरकांडे, संचालक राजेंद्र बोऱहाडे, मुख्याध्यापक राजेंद्र ढेरगे, समन्वयक पांडुरंग मुळीक तसेच सर्व शिक्षक आणि पालकांनी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱया सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.  

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2021 -22 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी अगोदरच जाहीर केली होती. नुकतेच शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन जाहीर करण्यात आले. यामध्ये विद्याभवन शिक्षण संकुलातील 31 विद्यार्थ्यांची प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.   

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

याहीवर्षी नवी मुंबई महापालिकेच्या ६० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती संपादन