पात्र विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन

महापालिका तर्फे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेची घोषणा

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता १ ली ते महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी (सन २०२१-२०२२, २०२२-२३) शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्याला ऑनलाईन पध्दतीने शिष्यवृत्तीसाठी महापालिका समाजविकास विभागाकडे अर्ज दाखल करावे लागणार आहे. सदर ऑनलाईन योजना पध्दतीने २१ डिसेंबर २०२२ पासून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती घ्ोऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन महापालिका समाज विकास विभाग तथा परिमंडळ-१चे उपायुवत दादासाहेब चाबुकस्वार यांनी व्ोÀले आहे.  

गतवर्षी शिष्यवृत्ती योजनेकरिता (सन २०२०-२१) जवळपास ३७ हजार हुन अधिक अर्ज महापालिका समाज विकास विभागाकडे जमा झाले होते. त्यातील पात्र विद्यार्थ्यांची यादी काढून संबंधित विद्यार्थ्यांना अंदाजे २२ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे बँकांमार्फत वितरण करण्यात आले आहे. यातील काही विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले. तर काहींचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिले. सदर अर्जांवर देखील निर्णय घ्ोण्यात आला असून लवकरच या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप होणार असल्याचे उपायुवत चाबुकस्वार यांनी सांगितले.
 

शिष्यवृत्तीचे घटकः
विधवा-घटस्फोटित महिलांच्या मुलांना तसेच मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. आर्थिक आणि दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. नवी मुंबई क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन शिक्षण घ्ोणाऱ्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. नवी मुंबई क्षेत्रातील महापालिका आस्थापनेवरील सफाई कामगार, कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे. नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण, बांधकाम, रेती, नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे.

 अटी-शर्तीः
विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या वार्षिक परीक्षेत किमान ६५ टवव्ोÀ गुण किंवा अ श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा. (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांकरिता)
विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या परीक्षेत किमान ६० टवव्ोÀ गुण किंवा ब श्रेणी मध्ये उत्तीर्ण असावा. (मागासवर्गीय लाभार्थ्यांकरिता)
नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण घ्ोत असलेले विद्यार्थांना या योजनेचा लाभ घ्ोता येणार नाही.
ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश Rऊिं अंतर्गत झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्ोता येणार नाही.
विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे आणि आधारकार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
अर्जामध्ये विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक आणि घ्इएण् म्द्‌ा चुकीचा आढळल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी लाभार्थ्यांवर राहील.
लाभार्थी कुटुंबाने या समान कारणांसाठी इतर कोणत्याही शासकीय, अशासकीय योजनेचा लाभ घ्ोतलेला नसावा.
एका कुटुंबातील फक्त दोन पाल्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्ोता येईल.
लाभार्थ्यांचे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात किमान ३ वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे.

सदर विविध घटकाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजना आवश्यक त्या कागदपत्रांसह प्ूूज्ेः//ैैै.हस्स्म्.ुदन्.ग्ह सदर संकेतस्थळावर शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार लाभार्थी स्वतः मोबाईल द्वारे किंवा संगणकावर अर्ज सादर करु शकतात. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्विकारण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरतेवेळी ज्या लाभार्थ्यास काही अडचणी निर्माण होतात त्यांनी नमुद केलेल्या आपल्या विभागाशी संबंधित समुहसंघटक यांच्या दुरध्वनीवर संपर्क करावा. शिष्यवृत्ती करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यत कार्यरत राहील. तद्‌नंतर लाभार्थ्यांना अर्ज सादर करता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. महापालिका क्षेत्रातील गरजू लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने समाज विकास विभागाचे उपायुवत दादासाहेब चाबुकस्वार यांनी व्ोÀले आहे.

आता शासनाच्या सर्व योजना ऑनलाईन झाल्या आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी देखील दोन वर्षे ऑनलाईन शिक्षण घ्ोतले आहे. यापूवार्ी ऑफलाईन पध्दतीने अर्ज भरल्यानंतर त्यातील कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार घडले आहेत, काहींच्या अर्जात वैयवतीक माहिती, बँक तपशील चुकीचा टाकण्यात आला. परिणामी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रवकम मिळण्यास दिरंगाई देखील झाली. त्यामुळे मानवीय हस्तक्षेप टाळून अचूक माहिती आणि लवकर शिष्यवृत्तीची प्रक्रिया राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने यावर्षीपासून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणे विद्यार्थ्यांना बंधनकारक व्ोÀले आहे. सन २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी दोन स्वतंत्र अर्ज करायचे आहेत.
-दादासाहेब चाबुकस्वार, उपायुवत-समाज विकास विभाग, नवी मुंबई महापालिका.

अधिक माहितीसाठी संपर्क-समाजसेवक (विभागनिहाय)ः
बेलापूर, नेरुळ                - प्रकाश कांबळे ९९६९००८०८८.
वाशी, तुर्भे                     - सुंदर परदेशी ९५९४८४१६६६.
कोपरखैरणे, घणसोली    - दादासाहेब भोसले ९३७२१०६९७६.
ऐरोली, दिघा                - दशरथ गंभिरे ९७०२३०९०५४.
 

समुह संघटकः
बेलापूर- मोहन गायकवाड ८६५२४४११०१, अनुपमा आरकडे ८६५५५९०४६५.
नेरुळ - प्रियंका पाटील ९०८२३११४४०, किरण विश्वासराव ९८१९२०४१४५, प्रिती दातार ९००४४०९८७१५.  
वाशी - संतोष सुपे ८३८०९८७४५६, निलीमा धोंगडे ९३२६५४०२७७.
तुर्भे - स्वप्नाली म्हात्रे ९०८२४४४४७४, जिज्ञेश देवरुखकर ९००४१८२४१२.
कोपरखैरणे - स्मिता व्यवहारे ८६८९८६८३३३, गजानन चव्हाण ९३२२६०१८०५, कविता पाटील ९७६८४८४८८२.
घणसोली - संतोष मोरे ९००४०९८७१६,  संतोष गावित ७९७७१७०२३७.
ऐरोली - प्रतिक्षा हुंडारे ८८९८३२९६२२, मनोहर राऊत ९२२४६४१२२४.
दिघा - विजय चव्हाण ८२९१४५२७८१, हेमंत परते ९५४५३६२५६८. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन जाहीर