महापालिका शिक्षण विभागात १०८१ नवीन पदांना शासनाची मंजुरी

नवी मुंबई -: नवी महानगर पालिकेचा शिक्षण विभागाचा गाडा अपुऱ्या शिक्षकांच्या खांद्यावर हाकला जात होता.त्यामुळे येथील शिक्षकांवर मोठा ताण पडत असे.त्यामुळे मनका शिक्षण विभागात नवीन पदे निर्माण करण्यास आयुक्तांनी शासनाकडे मागणी केली होती.त्या मागणीनुसार आता राज्य शासनाने १०८१ नवीन पदांची निर्मिती  करण्यास मंजुरी दिली असून त्याबाबत १५.डिसेंबर शासन आदेश पारित केले आहेत.त्यामुळे मनपा शिक्षण विभागात मोठी भरती होणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील  दर्जेदार शिक्षण पाहता दरवर्षी विद्यार्थ्याच्या पट संख्येत वाढ.होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या १३५ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण ५८, ४२८ विद्यार्थी असून, १०५७ इतके शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण ४५० खाजगी शाळा आहेत. सदर शाळांमध्ये एकूण २,१८, ६२४ विद्यार्थी असून, ९,६२४ इतके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. सदर खाजगी शाळांच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदार देखील महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर दिवसेंदिवस ताण वाढत असून, महानगरपालिकेच्या शिक्षण विभागास मोठ्या प्रमाणावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कमरता जाणवत आहे.

नवी मुंबई  महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध संवर्गात पदनिर्मिती करण्यासह महानगरपालिकेच्या ३,९३५ पदांच्या आकृतीबंधास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. सदर आकृतीबंधानुसार महानगरपालिकेच्या शिक्षण विभागासाठी २९ शिक्षकेतर पदे मंजूर आहेत. तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेकडील आदेशानुसार महापालिकेसाठी ७७८ शिक्षक व शिक्षकेतर पदे मंजूर आहेत.त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागासाठी अधिकारी, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका व अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांची एकूण १०८१ नवीन पदे निर्माण करण्यास  मान्यता द्यावी अशी मागणी मनपा आयुक्तांनी केली होती.त्यानुसार वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३ व वर्ग-४ ची एकूण १०८१ पदे नव्याने निर्माण करण्यास  शासनाची मान्यता देण्यात आली आहे.याबाबत नगरविकास खात्याने १५ डिसेंबर रोजी आदेश पारित केले आहेत.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पात्र विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारी २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन