जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे  यांच्या  मार्फत दि.17 डिसेंबर 2022  महारोजगार  मेळावा 

 ठाणे :  रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे  यांच्या  मार्फत दि.17 डिसेंबर 2022  पंडित दिनदयाल उपाध्याय  महारोजगार  मेळावा  सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत गुणगोपाळ मंदिर मैदान, तिसगाव, चक्की नाका चौक, कल्याण पूर्व, ठाणे-421306   येथे आयोजित करण्यात आला आहे.

 सदर मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री  मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  यामध्ये ठाणे येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत.  तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

          स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय करणारे महामंडळांचा सहभाग :- या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय उपलबध करून देणारे विविध शासकिय महामंडळे सहभागी 

होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाउ साठे विकास महामंडळ  इ. ची माहिती पुरविणारी स्टॉल लावण्यात येणार असून याव्दारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकिय व खाजगी क्षेत्रातील बँकांचा हि समावेश असणार आहे. (विविध क्षेत्रात  एकून - 12842 पदे उपलबध आहेत.)

        महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी :- राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उदयोजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राज्यात  प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या विविध प्रशिक्षण योजनांच्या माहिती देण्यासाठी सहभागी होणार आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

चला खेळ खेळूया अंतर्गत विस्मृतीत गेलेले बैठे आणि मैदानी खेळ ऐरोली येथे एकदिवसीय कार्यशाळा