निसर्गोद्यानात आज  विद्यार्थी, नागरिक रेखाटणार चित्रमय स्वच्छता संकल्पना

नवी मुंबई ः ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सामोरे जाताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांचा स्वच्छता कार्यात सहभाग घ्ोतला जात आहे. अशाच प्रकारच्या स्वच्छता विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे, सेक्टर-१४ येथील निसर्गोद्यानात आज २ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ८ हजाराहुन अधिक विद्यार्थी, नागरिक एकत्र येऊन नवी मुंबईचे स्वच्छता चित्र रेखाटणार आहेत.
‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२' मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई महापालिकेला लाभला असून यामध्ये नागरिकांच्या प्रत्येक उपक्रमातील स्वयंपूर्ण सहभागाचा मोठा वाटा राहिला आहे. नागरिकांच्या स्वच्छता विषयक विविध संकल्पनांना मुक्त वाव मिळावा याकरिता महापालिकेने विविध कलात्मक स्पर्धा उपक्रमांचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या भित्तीचित्र स्पर्धेलाही चित्रकारांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्यापाठोपाठ आता चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

याअंतर्गत स्पर्धा स्थळी येऊन माझे शहर-माझा सहभाग, प्लास्टिकमुक्त नवी मुंबई आणि ३ आर (Rा्‌ल्म, Rाल्ेा, Rाम्ब्म्त) या ३ पैकी एका विषयावर चित्र काढावयाचे आहे. चित्र काढण्याकरिता महापालिकेच्या वतीने कागद देण्यात येणार असून त्यासाठी लागणारे रंग आणि साहित्य स्पर्धकाने स्वतः आणावयाचे आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चित्रांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

दरम्यान, महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी, नागरिक चित्रकारांनी कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानासारख्या आकर्षक स्थळी येऊन निसर्गरम्य वातावरणात आपल्या मनातील स्वच्छता विषयक संकल्पनांची चित्ररुपात मांडणी करावी. त्याद्वारे सदर उपक्रम यशस्वी करुन ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'मध्ये जागरुक स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिक म्हणून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

एफ. जी. नाईक महाविद्यालयात संविधान व त्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.