एफ. जी. नाईक महाविद्यालयात संविधान व त्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन.

कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण संस्थेच्या एफ. जी. नाईक महाविद्यालयात संविधान दिन साजरा

नवी मुंबई ः कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण संस्थेच्या एफ. जी. नाईक महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून भारतीय संविधान व त्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक रमेश गायकवाड सर, जनरल एज्युकेशन सोसायटी, महिलाविद्यालय, डोंबिवली हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर एफ.जी. नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, एन एस एस युनिट चे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रमोद साळुंखे, डॉ. कविता पवार व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक पर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रताप महाडिक सर यांनी संविधानाची ओळख करून देत आपण समाजात वावरत असताना आपल्या मूलभूत कर्तव्यांना बगल देत चाललो आहोत तसेच त्याने विद्यार्थ्यांना सर्वप्रथम संविधान काय आहे? कोणासाठी आहे या शिवाय त्यातील तरतुदी कोणकोणते आहेत याबाबत उलगड करण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक रमेश गायकवाड सर यांनी अतिशय सोप्या व ओघवत्या भाषेत संविधानाचा इतिहास व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्याचबरोबर इतर देशातील लोकशाही व भारतीय लोकशाही यामधील फरक समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. संविधानातील विविध कलमावर सरांनी प्रकाशझोत टाकत संविधानाचा इतिहास तसेच मूलभूत कर्तव्य सांगून त्याचे पालन कशाप्रकारे केले पाहिजे याबद्दल विद्यार्थ्यांना जागृत केले तसेच संविधान बनविण्या मागचे उद्दिष्ट समजावून सांगितले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानादरम्यान प्रश्न उत्तरांचा तासही झाला ज्यामध्ये प्रमुख अतिथी प्राध्यापक रमेश गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे व प्रश्नांचे निरसन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्राध्यापिका संगीता वास्कर मॅडम यांनी केले व उपस्थित यांचे आभार प्राध्यापक प्रमोद साळुंखे यांनी मांडले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेचा उद्यापासून शुभारंभ