राष्ट्रीय शैक्षणिक धोरणअंमलबजावणीची आव्हाने  तथा संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

सिकेटी कॉलेज न्यू पनवेल येथे  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणअंमलबजावणी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन

 पनवेल : चांगु काना ठाकूर आर्टसकॉमर्स  अँड सायन्स  कॉलेजन्यू पनवेल (स्वायत्त)येथे  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीची आव्हाने  तथा संधी या विषयावर महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त उच्च शिक्षण कोकण विभाग,राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत व आय.क्यू.ए.सी. च्या समन्वयाने एक दिवसीय कार्यशाळेचे (दि. २३ नोव्हेंबर) आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी आय.आय.टी. येथील भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक प्रो.बी.एन.जगताप,जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, कोकण विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ.संजय जगतापराष्ट्रीय उच्चतरशिक्षा अभियानाचेवरिष्ठ सल्लागार मा.डॉ.पी.एन.पाबरेकर,मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरूमा.प्रो.डॉ. नरेश चंद्रा,उच्च शिक्षणातील संशोधक आनंद अरुण मापुस्कर आणि संस्थेचे सचिव मा.डॉ. एस. टी. गडदे उपस्थित होते.

कार्यशाळेची सुरवात अतिथींच्या स्वागताने झाली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील यांनी महाविद्यालयातील कीर्तीचा मागोवा घेत, महाविद्यालयाद्वारे संचालित विविध अभ्यासक्रमांचा आढावा घेतलाव राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या दृष्टीने महाविद्यालयाने सुरु केलेल्या सुविधांची माहिती दिली. प्रो.डॉ. नरेश चंद्रा व डॉ.संजय जगताप यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीची आव्हाने  तथा संधी याबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव सांगितला व भविष्यकाळातील संधी व आव्हाने याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले.

प्राचार्यांच्या संबोधना नंतर या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रो.बी.एन.जगताप यांनी उच्च शिक्षण क्षेत्राची पुनर्रचना याबाबत माहिती दिली त्यात ते असे म्हणाले की, सर्व उच्च शिक्षण संस्था बहुविद्याशाखीय संस्था बनतील.तसेच व्यावसायिक शिक्षण हा उच्च शिक्षण प्रणालीचा अविभाज्य भाग असेल.

द्वितीय सत्रात आनंद अरुण मापुस्करयांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीची आव्हाने व शैक्षणिकआर्थिकप्रशासकीय संधी बाबतची माहिती दिली.या कार्यशाळेसाठी कोकण विभागातील स्वायत्त आणि ‘अ ‘ दर्जा प्राप्त केलेल्या महाविद्यालयांचे  प्राचार्य, व्यवस्थापन समितेचे सदस्य व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

प्रथम सत्रात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.बी.डी.आघाव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाचा सारांश वाणिज्यशाखेचे प्रमुख प्रो.डॉ.एस.बी.यादव यांनी सांगितला. द्वितीय सत्रात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.एन. सी.वडनेरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि कार्यक्रमाचा सारांश इंग्रजी विभागाचे प्रा.एस.एन.परकाळे यांनी सांगितले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.आकाश पाटील आणि प्रा.नितीन आरेकरव आभार प्रदर्शन कला शाखेचे प्रमुख प्रो.डॉ.बी.एस.पाटील यांनी केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 निसर्गोद्यानात आज  विद्यार्थी, नागरिक रेखाटणार चित्रमय स्वच्छता संकल्पना