केबीपी कॉलेज मध्ये जात वैधता प्रमाणपत्राबाबत कार्यशाळा संपन्न

नवी मुंबई ः जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे कार्यालयाच्या वतीने २१ नोव्हेंबर रोजी वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या जात वैधता प्रमाणपत्र कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सदर कार्यशाळेस विज्ञान शाखेतील इयत्ता ११ वी आणि १२ वी मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यशाळेवेळी समितीच्या अध्यक्षा वैदेही रानडे आणि उपायुक्त वासुदेव पाटील यांनी जात वैधता प्रमाणपत्राची कार्यपध्दती तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? याबाबत उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस ३४९ विद्यार्थी आणि पालक यांनी सहभाग नोंदविला होता. सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थी आणि पालक यांना विहित कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास मदत होणार आहे.  कार्यशाळा दरम्यान पालक आणि विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे, जात पडताळणीसाठी येणाऱ्या शंकाचे आणि अडचणींचे निराकरण झाल्याने उपस्थित विद्यार्थी-पालकांनी सदर उपक्रमाचे कौतुक केल्याची माहिती ठाण्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त तथा सदस्य वासुदेव पाटील यांनी दिली. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणअंमलबजावणीची आव्हाने  तथा संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न