चांगू काना ठाकूर महाविद्यालयातचा सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

पनवेल: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयात दिनांक २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ८ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ‘अ’ ग्रुप आणि  राष्ट्रीय छात्रसेना संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हे शिबीर राष्ट्रीय पातळीवर असून यामध्ये भारतातील महाराष्ट्र आणि ओडीसा राज्यांतील विविध जिल्ह्यातून एन.सी.सी.चे  ६५० कॅडेटस सहभागी झाले होते. १० दिवस चाललेल्या या शिबिरात रमाकांत नवघरे यांनी सायबर गुन्हेगारी या विषयावर व्याख्यान दिले. तसेच व्यक्तीमत्व विकास या विषयावर डॉ.दिवाकरन पिल्लई यांनी व्याख्यान दिले. याचबरोबर कर्नल नवीन शर्मा यांनी “खाकी वर्दी की लष्करी जीवन” या विषयावर व्याख्यान दिले. तसेच सैन्यदलातील रोजगाराच्या नवनवीन संधी या विषयावर कर्नल विक्रम सिंग यांनी व्याख्यान देवून कॅडेटसना मार्गदर्शन केले. मयूर पलांडे आणि त्यांचे सहकारी यांनी स्वसंरक्षण या विषयावर प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. 

       त्याचबरोबर  मुंबई दर्शन भेट या उपक्रमा अंतर्गत कॅडेटसनी नेव्हल डॉकयार्ड, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई विद्यापीठ इ. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली. या शिबिरात व्हॉलीबॉल, खो-खो, समूह नृत्य, गायन, समुहगायन, राष्ट्रीय एकात्मता स्पर्धा, इ.स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर इस्पातर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर सुद्धा आयोजित केले होते. सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव मा.डॉ. एस.टी.गडदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हे शिबिर आयोजित केल्याबद्दल ब्रिगेडियर सी. मधवाल यांनी चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाचे  प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील यांचे सन्मानचिन्ह देवून आभार मानले आणि  कॅम्प कमांडंट, कर्नल नवीन शर्मा यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचेही  सन्मानचिन्ह देवून आभार मानले.

       या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, कॅप्टन प्रो.डॉ.उद्धव भंडारे, सी.टी.ओ. निलीमा तिदार, सर्व शाखा विभाग प्रमुख व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी  शिबिराच्या यशासाठी बहुमुल्य कार्य केले. या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल माजी खासदार व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, सचिव डॉ. एस.टी.गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' साठी नवी मुंबई सज्ज