‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' साठी नवी मुंबई सज्ज

नवी मुंबई ः ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२' मध्ये देशातील तृतीय क्रमांकाचा आणि राज्यातील सर्वप्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेली नवी मुंबई ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सामोरे जाताना व्यापक लोकसहभाग घेत सज्ज झाली आहे. स्वच्छतेचा संस्कार लहान वयापासूनच मुलांच्या मनावर करण्यासाठी शालेय स्तरावर स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. असेच दोन अभिनव उपक्रम महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या १४ नोव्हेंबर रोजीच्या बालदिनानिमित्त आयोजित करण्यात येत असून विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि नृत्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

घनकचरा व्यवस्थापन मधील दररोज नियमितपणे निर्माण होतो, त्याच ठिकाणी म्हणजे घरापासूनच कचऱ्याचे वर्गीकरण अतिशय महत्वाचा भाग असून घराघरात ओल्या कचऱ्यासाठी हिरवा डबा आणि सुक्या कचऱ्यासाठी निळा डबा ठेवला जात आहे. या अनुषंगाने कचरा वर्गीकरणाचे महत्व लहान मुलांमार्फत अधोरेखित व्हावे आणि ती त्यांचीही सवय व्हावी या दृष्टीने ‘रंगवूया आपला कचऱ्याचा डबा (झ्ीग्हू भ्दल्ी ँग्ह)' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील सहभागासाठी विद्यार्थ्यांनी कचऱ्याचे २ डबे घ्ोऊन त्याचे फोटो घ्यावेत आणि त्यावर ओला कचरा (हिरवा डबा) आणि सुका कचरा (निळा डबा) अशी संकल्पना लक्षात घेऊन विविध प्रकारे कलात्मकरित्या रंगकाम करावे. कचऱ्याच्या डब्यांची रंगरंगोटी करताना कोणत्याही विषयाचे बंधन नाही. रंगकाम केल्यानंतर पुन्हा फोटो घेऊन डबे रंगविण्यापूर्वीचा आणि डबे रंगविल्यानंतरचा फोटो समाज माध्यमांवर (एदम्ग्ीत् श्‌ग्ी) अपलोड करावा.


फोटो अपलोड करताना महापालिकेच्या अधिकृत समाज माध्यमांचे सर्व हॅन्डल्स म्हणजेच फेसबुक, टि्‌वटर, इन्टाग्राम यावर टॅग करणे अनिर्वाय आहे. त्याचप्रमाणे फोटो अपलोड करताना क्ष्प्ीीीउाात्ीएददव्प्ीऱात्ी आणि क्ष्एैीम्प्प्ीूीखदRीहु हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे.


अशाच प्रकारे स्वच्छ नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून किमान ५ कलावंतांच्या समुहाने आपला नृत्याविष्कार २ मिनिटे कालावधीचा व्हिडिओ काढून हस्स्म्‌ीहमम्दस्जूग्ूग्दहॅुस्ीग्त्.म्दस् ई-मेल आयडीवर १२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अपलोड करावयाचा आहे. मोबाईलद्वारे समुह नृत्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले असल्यास मोबाईलचा कॅमेरा आडवा धरणे अपेक्षित आहे. एकल नृत्य स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. विशेष म्हणजे झाडू, कचऱ्याचा डबा, हातमोजे अशा स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुंचा समावेश स्पर्धेसाठी सादर करण्यात येणाऱ्या नृत्यामध्ये असणे गरजेचे राहील. यामधील ५ स्पर्धक समुहांची निवड करण्यात येऊन १४ नोव्हेंबर रोजी बालदिन कार्यक्रमात त्यांचे अंतिम सादरीकरण होईल. तसेच त्यामधून सर्वोत्कृष्ट ३ क्रमांकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल.


नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मुलांमध्ये स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार होण्यासाठी बालदिनाचे औचित्य साधून सदर अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून याद्वारे मुलांमधील अंगभूत कलागुणांना उत्तेजन मिळणार आहे. तसेच नवी मुंबईच्या स्वच्छतेमध्ये नव्या पिढीचे अर्थात मुलांचे योगदान लाभणार आहे. सदर स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त शाळांमधील मुलांनी सहभागी व्हावे याकरिता त्यांचे शिक्षक, पालक यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर शाळा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने सन्मानित