आजी माजी विद्यार्थ्यांकडून व संस्थेच्या सर्व कर्मचा-यांकडून दत्ता मेघे यांना अनोख्या शुभेच्छा

नवी मुंबई : शिक्षणमहर्षी दत्ता मेघे यांच्या वाढदिवसानिमत्त श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांकडून व संस्थेच्या सर्व कर्मचा-यांकडून दत्ता मेघे यांना अनोख्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अव्यक्त भावनांना मोकळी वाट हा शुभेच्छापत्रांचा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय नवी मुंबई स्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  

ऐरोलीतील श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्थेने गेल्या 25 वर्षांपासून बहुजन, पीडित, गरीब, कष्टकरी व सर्व सामान्य वर्गास शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षितच नव्हे, तर सुसंस्कृत बनविण्याचे कार्य केले आहे. उत्कर्षाच्या नव्या नव्या क्षितिजांवर आज संस्थेचे अनेक विद्यार्थी आहेत. या संस्थेची वाटचाल आजही तितक्याच प्रगतीने सुरु असून ही शिक्षणसंस्था उभारण्यात विद्यमान अध्यक्ष दत्ता मेघे यांचे मोलाचे योगदान आहे. दत्ता मेघे यांचा येत्या 11 नोव्हेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांकडून व संस्थेच्या सर्व कर्मचाऱयांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अव्यक्त भावनांची मोकळी वाट हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.  

या उपक्रमांतर्गत विद्यार्थांना दत्ता मेघे यांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र तयार करुन आपल्या ऋण भावना व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. त्याशिवाय दत्ता मेघे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई स्तरावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी दंत रोग निदान शिबिर, विद्यार्थी व पालकांसाठी विविध स्पर्धा, सुंदर शालेय परिसरासाठी फुलांच्या रोपांचे रोपण, अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक, स्वच्छतेचे व आरोग्य विषयक साहित्य वाटप तसेच अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान व वाहक चालकांना अपघात नियंत्रणासाठी स्वयं घोषित संदेशवहन फलकाचे अनावरण असे विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.  

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मनविसे तर्फे आयोजित गडकिल्ले बांधणी स्पर्धा मध्ये 'स्वामी सांस्कृतिक मित्र मंडळ' प्रथम