मनविसे तर्फे आयोजित गडकिल्ले बांधणी स्पर्धा मध्ये 'स्वामी सांस्कृतिक मित्र मंडळ' प्रथम 

विजेत्यांचा रोख रक्कम देऊन गौरव

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नवी मुंबई (जुईनगर ते बेलापूर विभाग) तर्फे आयोजित गडकिल्ले बांधणी स्पर्धा मध्ये  जुईनगर येथील 'स्वामी सांस्कृतिक मित्र मंडळ'ने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मनसे मध्यवर्ती कार्यालय मध्ये नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत ५० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. बक्षीस वितरण समारंभात गडकिल्ले बांधणी स्पर्धा मधील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी नवी मुंबई शहर मनसे अध्यक्ष गजानन काळे, 'मनवासे'चे  सरचिटणीस नितीन खानविलकर, 'मनविसे'चे  नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांच्यासह मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

'गडकिल्ले बांधणी स्पर्धा'चा निकाल 

प्रथम क्रमांक - स्वामी सांस्कृतिक मित्र मंडळ, जुईनगर. 

द्वितीय क्रमांक - जगदंब मित्र मंडळ, सेक्टर - २, नेरुळ.  

तृतीय क्रमांक - श्रीमंतयोगी प्रतिष्ठान, सेक्टर - १८, नेरुळ. 

उत्तेजनार्थ बक्षीस - गुरुकृपा सोसायटी, सीवूडस.

जगदंब प्रतिष्ठान, सेक्टर - २, नेरुळ. 

मावळा प्रतिष्ठान, नेरुळ. 

नव्या पिढीने गडकिल्यांचा इतिहास समजून घ्यावा, गडकिल्यांचे संवर्धन करावे, या उद्देशाने 'मनविसे' तर्फे गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. - संदेश डोंगरे,  अध्यक्ष - नवी मुंबई शहर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला आजपासून प्राथमिक फेरीच्या उदघाटनाने प्रारंभ