‘आप'चे दिल्ली शिक्षण मॉडेल महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी

नवी मुंबई ः २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण महाराष्ट्र राज्य सरकार पुन्हा एकदा राबवणार असल्याचे सुतोवाच स्वतः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहेत. याचा सर्वात मोठा आणि दीर्घकालीन फटका ग्रामीण भागातील वंचित, दुर्बल आणि आदिवासी घटकांना तसेच मुख्यत्वे मुलींना बसणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सदर अन्यायकारक निर्णयाविरोधात ‘आम आदमी पार्टी' तर्फे राज्यभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी शिक्षण मंत्री दीपक व्ोÀसरकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देऊन निषेध व्यक्त केला जात आहे. त्याअनुषंगाने ‘आप-नवी मुंबई टीम'ने देखील शिक्षण विभागाच्या सदर धोरणाविरुध्द १५ ऑक्टबर रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजह चौक येथे शांतीपूर्ण निषेध आंदोलन कले. या आंदोलनामध्ये ‘आप'चे नवी मुंबई आणि पनवेल विभागातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सदर आंदोलनास ‘आप'च्या टीम दिघा नोड आणि ऐरोली नोड यांचे विशेष सहकार्य लाभले. सदर आंदोलनात ‘आप'च्या नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, मानसी पवार, कोपरखैरणे नोड अध्यक्ष अभिषेक पांडे, नीना जोहरी, धनवंती बच्चन, पनवेल जिल्हा अध्यक्ष जयसिंग शेरे, चिमाजी शिंदे, चिन्मय गोडे, स्नेहा उजगरे, महादेव गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘आप'च्या सदर महाराष्ट्र व्यापी निषेध, निवेदन आणि आंदोलनास प्रतिसाद देऊन राज्य शासनाने पटसंख्या कमी असणाऱ्या सरकारी शाळा बंद करण्याची कारवाई त्वरित रद्द करावी. अन्यथा ‘आप-महाराष्ट्र टीम'च्या वतीने मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शासनाला देण्यात येत आहे. -संतोष केदारे, युवा अध्यक्ष-आप नवी मुंबई.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

दिवाळीपर्यंत शिक्षक भरती न केल्यास तीव्र आंदोलन