महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेतर्फे संवाद सत्र आयोजन

फटाकेमुक्त दिवाळीसाठी संवाद सत्र

नवी मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेतर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर येथे फटाकेमुक्त दिवाळी अभियानांतर्गत १४ ऑक्टोबर रोजी संवाद सत्र आयोजीत करण्यात आले होते. 

दिवाळीचा आनंद फटाके न फोडताही द्विगुणीत करू शकतो. फटाके न फोडल्यामुळे शिल्लक राहिलेले पैसे आपण उत्तमोत्तम पुस्तके विकत घेऊन वाचण्यासाठी वापरू शकतो. सुंदर रांगोळी काढून आपल्या कल्पनांना वाव देऊ शकतो. स्वादिष्ट फराळ बनवून त्यांचा आस्वाद घेऊ शकतो. नवीन खमंग पदार्थ बनवायला शिकू शकतो. सुंदर व आकर्षक आकाश कंदील व शुभेच्छा पत्र बनवून छंद जोपासू शकतो. इतकेच नाही तर आपल्या गरजू मित्रमैत्रिणीना मदत करून आपण आनंदी होऊ शकतो. आपण आनंदी होताना इतरांनाही आनंदी करत फटाके मुक्त दिवाळी साजरी करु या असे आवाहन यावेळी ववते महेन्द्र राऊत यांनी विद्यार्थ्यांना केले. सदर संवाद सत्रात अरूण जाधव  व अशोक निकम यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘आप'चे दिल्ली शिक्षण मॉडेल महाराष्ट्रात लागू करण्याची मागणी