घरी आकाशकंदील आणि पणती बनवू इच्छिणाऱ्यांसाठी एक पर्वणीच

ठाणे ः दिवाळी सण म्हटल्यावर सगळीकडे उत्साह, जोष आणि आनंदाचे वातावरण. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी सणानिमित्त सातत्याने ५व्या वर्षी आपली संस्कृती, परंपरा न हरवता आगळीवेगळी ओळख आजही जपत सारे काही उजळवून टाकण्यासाठी, प्रकाशित करण्यासाठी, शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे (पूर्व) तर्फे येत्या १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता ‘राजेंद्रपाल मंगला हिंदी हायस्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, लोकमान्य टिळक रोड, ठाणे (पूर्व) येथे प्रा. श्याम धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आता आकाशकंदील बनवा आणि पणती रंगवा घरच्या घरी' या संकल्पना अंतर्गत ‘आकाशकंदील आणि पणती पेंटींग कार्यशाळा-२०२२', आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये कंदिलोत्सव आणि दिपोत्सव होणार आहे. घरी आकाशकंदील आणि पणती बनवू इच्छिणाऱ्यांसाठी सदर कार्यशाळा म्हणजे एक पर्वणीच आहे.

‘आता आकाशकंदील बनवा आणि पणती रंगवा घरच्या घरी' या कार्यशाळेत १० वर्षांवरील मुले-मुलींना तसेच १० वर्षाखालील मुले-मुलींना आजी किंवा आजोबा किंवा आई किंवा बाबा याच्याबरोबर शेजारी-शेजारी वा एका घरातील भावंडे एकत्र जमून सहभाग घेता येणार आहे. या कार्यशाळामध्ये पारंपरिक कलात्मक (करंजी कंदील) कंदील बनविण्याचे आणि वैविध्यपूर्ण पणती रंगविण्याचे मार्गदर्शन सर्वांना मिळणार आहे. स्वतः केलेले आकाशकंदील आणि रंगवलेल्या पणत्या घरात लावून यंदाची दीपावली साजरी करण्याचा आनंद मुले-मुलींसह पालकांनाही घेता येणार आहे, असे प्रसिध्दी पत्रकात ‘शिवसेवा मित्र मंडळ'चे अध्यक्ष अजय नाईक यांनी नमूद केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९८३३१५८८००,९२२४१९९९७९,९९३०३२०९९८. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेतर्फे संवाद सत्र आयोजन