पिंच्याक सिलॅटच्या सहाव्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत देशाच्या ४० खेळाडूंत महाराष्ट्राचे १६ जण

 ६ व्या एशियन पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप निवड चाचणीत राज्यातील १६ खेळाडूंची निवड

  नवी मुंबई ः ६ व्या एशियन पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिपकरिता भारतातील ४० खेळाडूंमध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघातील पिंच्याक सिल्याट खेळाच्या चार प्रकारात १६ खेळाडूंची निवड झाली आहे. टॅडींग (फाईट) अक्षय काळसेकर, रामचंद्र बदक, सोमनाथ सोनावणे, सुहास पाटील, मुकेश चौधरी, वैभव काळे, ओमकार अभंग, अनुज सरनाईक, आकाश जाधव आणि प्राजक्ता जाधव; तुंगलमध्ये कृष्णा पांचाळ, गंडा - 1 मध्ये सचिन गर्जे व सोमनाथ सोनावणे तर रेगु प्रकारामध्ये अंशुल कांबळे, वैभव काळे, ओमकार अभंग, कार्तिक पालवे, रिया चव्हाण, जयश्री शेट्टे व प्राजक्ता जाधव यांची निवड इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, सचिव मुक्ती हमीद, मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद इक्बाल इरफान बुत्तो यांच्या निवड समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 ६ वी एशियन पिंच्याक सिलॅट चॅम्पियनशिप  स्पर्धा शेर ए काश्मीर इंडोर स्टेडियम, श्रीनगर  जम्मू आणि काश्मीर येथे होणार असुन ही स्पर्धा इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनने आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये इंडोनेशिया, सिंगापुर, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, कजाकिस्तान, फिलिपिन्स, इराण, यमन, श्रीलंका,नेपाळ, तैवान उज्बेकिस्तान, भुतान, बांग्लादेश, रिपब्लिक ऑफ कोरिया आदि देशातील २८६ खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांनी दिली. 

 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

घरी आकाशकंदील आणि पणती बनवू इच्छिणाऱ्यांसाठी एक पर्वणीच