नील शेकटकर ठरला जगातील सर्वात कमी वयाचा जलतरणपटू

नवी मुंबई ः वयाच्या बाराव्या वर्षी बेलापूर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया असे २६ किलोमीटरचे सागरी अंतर जलतरणातील अवघड समजल्या जाणाऱ्या बॅकस्ट्रोक पध्दतीन पूर्ण करणारा मास्टर नील सचिन शेकटकर  जगातील सर्वात कमी वयाचा जलतरणपटू ठरला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌ आणि बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌ मध्ये नावाची नोंद नुकतीच करण्यात आली आहे.


नवी मुंबईतील जलतरणपटु नील शेकटकर याने २ एप्रिल २०२२ रोजी बेलापूर जेट्टी येथून मध्यरात्री १२ वाजून ५४ मिनिटांनी जलतरणास सुरुवात केली. यानंतर ५तास ३२ मिनिटांचे अंतर पार करुन तो ६ वाजून ३४ मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचला. अशा प्रकारे नील शेकटकर याने नवीन विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला होता. या विक्रमाची नोंद भारत सरकारमान्य संस्था इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌ आणि बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डस्‌ यांनी घेतली आहे.


उरणच्या समुद्रामध्ये दर आठवड्याला चार ते पाच तास आणि स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स मध्ये रोज सात ते आठ तास नील शेकटकर सराव करत होता. संदीप यादव, अमित आवळे, किशोर पाटील आणि मास्टर माईंड गोकुळ कामत या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन नीलला लाभले आहे. नीलची आई सौ. हेमांगी शेकटकर यांनी त्याच्या पौष्टिक आहाराची नेहमीच काळजी घेतली. वडील सचिन शेकटकर यांच्या भक्कम पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळेच नीलला जागतिक विक्रम करणे सोपे झाल्याचे सांगण्यात आले. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पिंच्याक सिलॅटच्या सहाव्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत देशाच्या ४० खेळाडूंत महाराष्ट्राचे १६ जण