महापालिका सीबीएसई शाळेमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

नवी मुंबई ः राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती महापालिका संचालित सीबीएसई शाळा क्रमांक-९४ कोपरखैरणे येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमच्या आरंभी शाळेचे सहाय्यक शिक्षक प्रमोद दामले आणि शिक्षिका यास्मिन शेख यांच्या हस्ते थोर व्यक्तींच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. यावेळी लालबहादुर शास्त्री आणि महात्मा गांधी यांच्या विषयी कुमार दर्शन शिगवण, वैष्णवी थोरात,मानसी कदम, साक्षी महामुलकर, सौभाग्य धनपत, सोहम मसुरकर यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.


महात्मा गांधींनी सत्य अहिंसा या तत्त्वावर चालून भारत मातेला मुक्त करण्यासाठी केलेला त्याग आणि प्रयत्न तर लालबहादूर शास्त्री सारख्या अत्यंत साध्या आणि तत्व प्रिय व्यक्तिमत्वाने भारत मातेसाठी केलेल्या निस्पृह त्याग आणि सेवेचे वर्णन विद्यार्थ्यांनी अत्यंत मार्मिक शब्दात व्यक्त केले. शिक्षिका आरती बोरसे यांनी सादर केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. शिक्षक आशिष रंगारी यांनी भजन सादर केले. शिक्षक प्रमोद बामले यांनी तंबाखूमुक्त शाळा, कविता वाडे  यांनी माझी वसुंधरा बाबतची प्रतिज्ञा आणि स्वच्छता हीच सेवा या विषयावर प्रतिज्ञा अश्विनी शेलार यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कर्मचारी यांना दिली.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मारुती गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ जयंती न करता आपण आपल्या जीवनात थोर व्यक्तींनी आपणास दिलेल्या मूल्याची जोपासना करतानाच स्वच्छता रोजचा सण समजून प्रत्येकांनी शाळा, घर, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असले पाहिजे, असे सांगितले.


दरम्यान, यावेळी चित्रकला स्पर्धा संपन्न झाली. यानंतर शालेय परिसर, जवळचे क्रिकेट मैदान येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

सीबीएसईच्या शाळेत शिक्षकांची कमतरता,पालक हवाल दिल