तेजसच्या ढोलकीचा सोलो परफॉर्म व सौजसने सुमधूर गाणी गात रसिकांची जिंकली मने

ठाण्यातील ढोलकीपटू तेजस मोरे कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित

ठाणे ः स्वामी विवेकानंद रिसर्च अ‍ॅण्ड ट्रेसिंग इन्स्टिट्युट एक्सल इंडस्ट्रिज लोटे आणि शाहीर रत्नाकर महाराज फाउंडेशनच्या वतीने ठाण्यातील रहिवासी व सुधागड तालुक्यातील हातोंड गावचा  सुप्रसिद्ध ढोलकीकींग तेजस पुंडलिक मोरे यास कोकण कलारत्न पुरस्काराने लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष  प्रशांत पटवर्धन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. परशुराम लोटे, रत्नागिरी येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

यावेळी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन जनरल सेक्रेटरी राज आंब्रे, कोकण दिंडीचे फड मालक ह.भ .रुपेश महाराज राजेशिर्के, व्हीं आर् टी.आय प्रकल्प सन्वयक  विवेक शेंडे, मुख्य प्रवर्तक सुरेश पाटणकर, दिलीप जी जाधव आदी उपस्थित होते. यावेळी तेजसच्या ढोलकीचा सोलो परफॉर्म व सौजसने सुमधूर गाणी गात रसिकांची मने जिंकली.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

कविता समरसून शिकविणारे गुरुजन चिरकाल स्मरणात