डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीचा कार्यक्रम

कर्मवीर अण्णांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत रहा -  रामशेठ ठाकूर यांचा विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला 

पनवेल - प्रत्येक विद्यार्थ्याने कर्मवीर अण्णांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत रहावे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर यांनी उलवेनोड येथे आज केले. रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय सीबीएसइ व मराठी माध्यामीक विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीचा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

        रयत शिक्षण संस्थेच्या उलवा नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय सीबीएसई व मराठी माध्यमिक विद्यालयात कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या १३५ च्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून 'कर्मवीर जयंती विशेष सप्ताह' निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच इंदोर येथे आयोजीत केलेल्या राष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालयातील जतीन ठाकूर या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, रयतचे जनरल बॉडी सदस्य वाय.टी.देशमुख, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर एस.टी.गडदे, मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, कविता खारकर, माजी उपसरपंच जगदीश खारकर, राजेश खारकर, मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, एस.एम बल्लाळ, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणीता गोळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

तेजसच्या ढोलकीचा सोलो परफॉर्म व सौजसने सुमधूर गाणी गात रसिकांची जिंकली मने