वागळे इस्टेट येथील लघुउद्योजक असोसिएशनच्या टीसा हाऊस येथे दोन दिवस प्रदर्शन

जिल्ह्यातील उद्योजकांसाठी 29 व 30 सप्टेंबर रोजी कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन

 ठाणे  :- ठाणे जिल्ह्यातील उद्योजकांसाठी निर्यात, गुंतवणूक वृध्दी, व्यवसाय सुलभीकरण व एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने येत्या 29 सप्टेंबर व 30 सप्टेंबर 2022 रोजी या दोन दिवशीय प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते होणार असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राने कळविले आहे.

            वागळे इस्टेट येथील लघुउद्योजक असोसिएशनच्या टीसा हाऊस येथे दोन दिवस सकाळी 10 ते 5 या वेळेत ही कार्यशाळा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी या कार्यशाळा व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी केले आहे.

            निर्यातदार उद्योग घटकांना लागणाऱ्या आवश्यक बाबी जसे विविध परवानग्या नोंदणी व विविध योजना या बाबींची माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी विविध तज्ज्ञ, शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच निर्यात संबंधी येणाऱ्या अडचणी, तसेच उद्योग विभागाचे सहकार्याने उद्योग सुरु केलेल्या उद्योजकांचे उत्पादनांचे प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे, असेही जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022