कर्मवीर अण्णांच्या जीवनावर विविध स्पर्धांचे आयोजन

‘मॉडर्न  स्कुल'तर्फे कर्मवीर जयंती साजरी

नवी मुंबई ः ‘रयत शिक्षण संस्था'चे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ वी जयंती ‘रयत शिक्षण संस्था'च्या वाशी, सेवटर-७ मधील मॉडर्न स्कुल आणि केबीपी कॉलेज तर्फे ‘कॉलेज'च्या प्राचार्या शुभदा नायक आणि स्कुल'च्या मुख्याध्यापिका सुमित्रा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. यावेळी आठवडाभर विविध कार्यक्रम संपन्न झाले. दोन्ही संस्थांमनधील विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहभागातून वाशी विभागात ‘कर्मवीर रॅली'चे आयोजन करण्यात आले होते.तसेच मॉडर्न स्कुल येथे कर्मवारी डॉ.भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे प्राध्यापक आबा सरोदे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याशिवाय संकल्प सेवा समिती-नवी मुंबई आणि येरळा  हॉस्पिटल-खारघरच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, कर्मवीर अण्णांच्या जीवनावर निबंध स्पर्धा, ववृÀत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, परिसर स्वच्छता, महापालिका रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप, आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमांमध्ये मॉडर्न स्कुलचे प्राथमिक विभाग मुख्याध्यापक रविंद्र वाघ, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकांनी सहभाग घेतला. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

वागळे इस्टेट येथील लघुउद्योजक असोसिएशनच्या टीसा हाऊस येथे दोन दिवस प्रदर्शन