विज्ञान, गणित शिक्षकांसाठी ठाणे जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

ठाणे ः राज्य शैक्षणिक संशोधन-प्रशिक्षण परिषद आणि भारतीय विज्ञान शिक्षणआणि संशोधन संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इनोव्हेशन कोचेस (शिक्षक) प्रशिक्षणासाठी आयराईज उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमास विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, ब्रिटीश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री आणि टाटा टेक्नॉलॉजीस्‌ यांचे पाठबळ लाभले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील विज्ञान आणि गणित शिक्षकांसाठी जिल्हा शिक्षण- प्रशिक्षण संस्था-ठाणे द्वारे तीन दिवसीय कार्यशाळा २१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत डोंबिवली येथे संपन्न झाले.

दरम्यान, या कार्यशाळेचे प्रयोजन नवोपक्रम, स्टेम आणि मूल्यमापन साधनांवर शिक्षकांना मार्गदर्शन करणे होते. कार्यशाळेनंतर शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यास तसेच समस्या सोडवण्यासाठीत्यांच्यात नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न करणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच आश्रमशाळा मधील ४८ गणित आणि विज्ञान शिक्षक तसेच १२ विज्ञान विषय साधनव्यवती सदर प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते. आयसर पुणे द्वारा प्रशिक्षित ठाणे जिल्ह्यातील इनोव्हेशन चॅम्पियन शिक्षक शेखर जगताप (एन.आर.भगत स्वुÀल-नेरुळ), रणजीत पाटील आणि पांडुरंग भोईर यांनी सर्व प्रशिक्षण सत्रांना मार्गदर्शन केले. आयराईज टीम तर्फे शांती पिसे, संकेत राऊत आणि शिवानी पुलसे प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. दिनेश चौधरी यांचे मार्गदर्शन या प्रशिक्षण कार्यक्रमास लाभले.


ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांसाठी सदर तीन दिवसीय कॅस्केड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. भरत पवार यांनी भूषावले. तर गार्डियन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती मेनन यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रशिक्षणात सर्व सहभागी शिक्षकांना गणित आणि विज्ञान विषयावर
कृतियुक्त मार्गदर्शन करण्यात आले. शिकविण्यास उपयोगी साहित्य संच तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा विज्ञान आणि गणितातील कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना सहज स्पष्ट करण्यास मदत होईल, असे प्रशिक्षणार्थींनी सांगितले. प्रशिक्षण समारोप कार्यक्रमास डॉ. मनिषा ताठे (पुणे), ठाणे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) ललिता कावडे, डाएट ठाणे मधून डॉ. दिनेश चौधरी, डॉ.प्रभा खरटमोल तसेच आयसर पुणेच्या शांती पिसे यांनी मार्गदर्शन केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

कर्मवीर अण्णांच्या जीवनावर विविध स्पर्धांचे आयोजन