27 ते 28 सप्टेंबर कालावधीत तरुणांसाठीऑनलाईन रोजगार मेळावा

 जिल्ह्यातील तरुणांसाठी 2७ ते 2८ सप्टेंबर कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

ठाणे ः- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील उमेदवारांसाठी दि. 2७ सप्टेंबर 2022 ते 2८ सप्टेंबर 2022 या कालावधीत www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन आले आहे. व या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाण्याचे सहायक आयुक्त संध्या स. साळुंखे यांनी केले आहे. इच्छूक उमेदवारांनी पोर्टलवर (नोंदणी केली नसल्यास) जॉब सिकर म्हणुन नोंदणी करावी. नंतर पंडित दिन दयाळ जॉब फेयर या टॅब वर क्लिक करावे व पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा -4 या टॅब वर क्लिक करावे व उपलब्ध असलेल्या रिक्तपदाची माहिती पाहून विकल्प निवडून अर्ज सादर करावे, असे आवाहन श्रीमती संध्या स. साळुंखे यांनी केले आहे.

मुलाखतीचे तंत्र विषयावर गुरुवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नोकरी इच्छुक तरुणांसाठी दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4.00 वा. यशस्वी मुलाखत तंत्र व एनसीएस या विषयावर ऑनलाईन समुपदेशन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त तरुणांनी या मार्गदर्शन सत्रात उपस्थित रहावे, असे आवाहन ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाण्याचे सहायक आयुक्त संध्या स. साळुंखे यांनी केले आहे.

या सत्रास तरुण मार्गदर्शक आशुतोष साळी हे मार्गदर्शन करणार असून हे सत्र गुगल मिट वर आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घ्ोण्याकरीता https://meet.google.com/wkk-befh-fsp या लिंकवर क्लिक करुन सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती साळुंखे यांनी केले आहे.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नेरुळमध्ये १७ वर्षाखालील मुलींच्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे १० सामने