पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर मध्ये रक्तदान शिबिर

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघर तळोजा मंडलच्या वतीने खारघर मध्ये रक्तदान शिबिराचेआयोजित
 
खारघर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघर तळोजा मंडलच्या वतीने रविवारी खारघर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या  रक्तदान शिबिरात भाजपचे  युवानेते विनोद घरत यांच्यासह 70 व्यक्तीं रक्तदान करून सहभाग नोंदविला. विशेषतः या शिबिरात काही महिलांनी रक्तदान केले. या शिबिराला  आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. ठाकूर यांनी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या  कार्यकर्त्यांचे कौतुक  केले. सदर शिबीर श्री साई ब्लड बँक पनवेल  यांच्या सहकार्याने  संपन्न झाले.या शिबिराला भाजपचे  पनवेल तालुका  अध्यक्ष अरूणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेक्ष पटेल, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, प्रदेश अल्पसंख्याक सचिव मन्सूर पटेल,  ,माजी नगरसेवक हरीश केणी,  प्रवीण पाटील,अभिमन्यू पाटील,रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नीलेश बाविस्कर, अॅडव्होकेट नरेश ठाकूर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील,  जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सरचिटणीस दीपक शिंदे,  दिलीप जाधव, बीना गोगरी, वासुदेव पाटील, अमर उपाध्याय, अंबालाल पटेल, सचिन वासकर, प्रभाकर जोशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

आ. गणेश नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन