शिक्षक सर्वात भाग्यवान व्यक्ती - हभप एकनाथ पाटील

‘शिवछाया मित्र मंडळ'च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न 


नवी मुंबई ः समाजात चांगला बदल घडवायचा असेल तर चांगले विचार पेरण्याची गरज असून चांगले विचार पेरण्याचे काम शिक्षक करीत असतात. म्हणूनच विद्यादानाचे पुण्य फार वेगळे असून ते शिक्षकाला मिळत असते. त्यामुळे शिक्षक जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे, असे प्रतिपादन महापालिका शिक्षण समितीचे माजी सभापती तथा प्रवचनकार हभप एकनाथ पाटील यांनी तुर्भे येथे केले.


‘शिवछाया मित्र मंडळ'च्या वतीने तुर्भे येथील ‘नवी मुंबईचा राजा'च्या व्यासपीठावर आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून एकनाथ पाटील बोलत होते. याप्रसंगी किर्तनकार हभप सुनील महाराज रानकर, नाट्यकर्मी अशोक पालवे, ‘शिवछाया मित्र मंडळ'चे अध्यक्ष पत्रकार अंकुश वैती, उपाध्यक्ष सुशील घरत, सचिव अशोक पाटील, कोषाध्यक्ष रामकृष्ण पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते.


गुरु जीवनातील अंधकार दूर करणारी जगातील एक सर्वश्रेष्ठ व्यक्ती असून गुरु शिवाय माणूस घडूच शकत नाही. अशा या नवी मुंबईतील गुरुंचा सन्मान करण्याचे काम पत्रकार अंकुश वैती आणि त्यांच्या ‘शिवछाया मित्र मंडळ'च्या माध्यमातून होत आहे. सदर बाब कौतुकाची असल्याचे किर्तनकार-नाट्याचार्य हभप सुनील महाराज रानकर यांनी यावेळी सांगितले.


यावेळी ‘शिवछाया मित्र मंडळ'चे अध्यक्ष अंकुश वैती यांनी मंडळाच्या ५२ वर्षातील उपक्रमांचा मागोवा घेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरीः नरेंद्र कान्हा म्हात्रे, पद्माकर बाळकृष्ण पाटील, विकास बामा गायकवाड, मंगल सुभाष भोईर, अमृत हंसाराम पाटील, विद्याधर राघो पाटील, लक्ष्मण वामन माळी, सौ. कल्पना सुनील कोळी, जयप्रसाद वासुदेव सुतार, सौ. वंदना प्रेमनाथ पाटील, प्रदीप धनाजी म्हात्रे, सौ. अर्चना अजय तांडेल, हरेश केसरीनाथ तांडेल, केसरीनाथ दिनकर बंदरे, लक्ष्मण बाळाराम ठाकूर, सौ. संध्या गजानन पाटील, सौ. वृषाली विलास पाटील, सौ. जयमाला दिनेश पाटील, अनंत पोशा वैती, सुकन्या लांडगे. 

 

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

मुख्यमंत्र्यांचा राज्यातील शिक्षकांशी संवाद