संचालक डॉ. विलासराव कदम ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

भारती विद्यापीठ नवी मुंबई आयोजित भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई  - भारती विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. भारती विद्यापीठ नवी मुंबई संकुलाचे संचालक डॉ. विलासराव कदम ह्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला. विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  सामाजिक एकतेचा तसेच देशाने विविध क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीचा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रदर्शन करून एकतेचा संदेश दिला.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी डॉ. संध्या जाधव(प्राचार्य,भा.वि.कॉलेज ऑफ इंजिनीरिंग),प्रा. पी एन टंडन (प्राचार्य,भा.वि.इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि), डॉ.अंजली कळसे(संचालक,बी व्ही आय एम एस आर), डॉ. श्रीनिवासन (प्राचार्य, भा.वि.डेंटल कॉलेज),प्रा. सतीश ढाले (प्राचार्य, भा वि कॉलेज ऑफ अर्कीटेकचर),डॉ. विल्सन(प्राचार्य, भा वि कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेण्ट), डॉ.सुहासिनी विजयकुमार(संचालक,बी व्ही आय एम आय टी), प्रा. वैशाली जाधव(प्राचार्य, भा.वि.कॉलेज ऑफ नर्सिंग),तसेच प्राध्यापकवर्ग, कर्मचारीवर्ग आणि विदयार्थी ह्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि उपक्रम यशस्वी केला.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मुलांमध्ये जिज्ञासूवृत्ती, विज्ञानदृष्टी जागृत करण्याची गरज - डॉ.रघुनाथ माशेलकर