पालकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने वाहतूक सुरक्षा या विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन

नवी मुंबई वाहतूक विभागाच्या चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग  

नवी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत कोपरखैरणे येथील नॉर्थ पाईंट स्कूलचा इ.9वीतील हिर मेहुल मेहता या विद्यार्थ्याने तसेच चित्रकला स्पर्धेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा इ. 5 वीतील उद्दीपन बिस्वास या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकवला. या व इतर विजयी विद्यार्थ्यांचे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह, सह पोलिस आयुक्त जय जाधव, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, पोलिस उपायुक्त (गुन्हे) सुरेश मेंगडे, पोलिस उपायुक्त परि-1 चे विवेक पानसरे, परि-2चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, प्रादेशक परिवहन विभागाचे अधिकारी अनिल पाटील तसेच व्हाईस ओव्हर आर्टिस्ट अभिनेत्री मेघना एंरडे यांच्या हस्ते पारितोषीक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.  

 शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी माहिती होवून त्यांच्याकडून पालकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतुक विभागाच्यावतीने वाहतूक सुरक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी विष्णुदास भावे नाटÎगृहात संपन्न झाली. या स्पर्धेच्या अंतिमफेरीमध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये कोपरखैरणे येथील नॉर्थ पाईंट स्कूलचा इ. 9वीतील हिर मेहुल मेहता या विद्यार्थ्याने प्रथक क्रमांक पटकवला. तर सानपाडा येथील साधू वासवानी स्कूलमधील इ. 10 तील अंतरा सुभाष या विद्यार्थीनीने दुसरा आणि नेरुळ येथील विद्याभवन शाळेतील इ. 10 वीतील मारिया पटवेगार या विद्यार्थीनीने तिसरा क्रमांक प्राफ्त केला. तर स्नेहल शिंदे, सिध्दी महामनी यांना उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली. 

चित्रकला स्पर्धेमध्ये खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा इ. 5 वीतील उद्दीपन बिस्वास या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकवला. तर एपीएमसी येथील ऍवलॉन हाईट्स इंटरनॅशनल स्कूलची इ. 6वीतील रिया शर्मा या विद्यार्थीनीने दुसरा तर नेरुळ येथील एपीजे स्कूलची इ. 6 वी तील ईशा मोंगा या विद्यार्थीनीने तिसरा क्रमांक प्राफ्त केला आहे. यावेळी उत्तेजनार्थ विजेते म्हणून रुचीर कटियार तर किरणमई द्विवेदी या सर्व विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील 181 शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 22 हजार 648 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 13 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.   

या स्पर्धेसाठी वाहतूक सुरक्षा हा चित्रकला स्पर्धेसाठी विषय देण्यात आला होता.  या कार्यक्रमासाठी नवी मुंबई वाहूतक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक विभागाचे सर्व युनिट, प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष मेहनत घेतली. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

संचालक डॉ. विलासराव कदम ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न