एफ जी नाईक महाविद्यालयात मैत्री दिनाचा आणि फ्रेशर्स पार्टीचा जल्लोष

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एफ जी नाईक महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयाेजन

कोपरखैरणे : कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ. जी. नाईक महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे मैत्री दिन आणि फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करून  सांस्कृतिक समितीचे उद्घाटन कॉलेजचे प्राचार्य प्रताप महाडिक सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सजावट करून प्रांगणात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते .

प्रास्ताविक पर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक सर यांनी चालू शैक्षणिक वर्षात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना प्रोत्साहन दिले. आपले महाविद्यालय नेहमीच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे मार्गदर्शन प्राचार्य प्रताप महाडिक सर यांनी केले आणि सर्व विद्यार्थ्यांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयातील प्रथम वर्षी  प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रम प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. योगिता पाटील समिती सदस्य प्रा. संगीता वास्कर, प्रा.कविता पवार ,प्रा.चिन्मयी वैद्य आणि प्रा. सीमा शिंदे आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शना अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, गायन, वादन ,काव्य यातून मैत्री दिनाचा अनमोल संदेश सर्व विद्यार्थ्यांना दिला. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक खेळ आयोजित करण्यात आले होते आणि त्यातून मिस्टर अँड मिस फ्रेशर्स म्हणून एफ. वाय. बी. एस. सी. आय टी मधील प्रतीक्षा साठे मिस फ्रेशर  तर एफ . वाय .बी. एस. सी .आय टी मधील एकनाथ शेजुळ मिस्टर फ्रेशर म्हणून निवडले गेले आणि त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या खेळांमध्ये मोठ्या उत्साहाने व हिरीरीने विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला त्यामधून अखेरीस विविध प्रतियोगितांमधून अंतिम विजेत्यांची निवड करून त्यांना पारितोषिक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता वास्कर मॅडम व प्रा. कविता पवार मॅडम यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता  सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.योगिता पाटील मॅडम यांनी केले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पालकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने वाहतूक सुरक्षा या विषयावर विविध स्पर्धांचे आयोजन