शे.का.प. चा 75 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पनवेल : सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय पुढारी डोंगर-झाडी-दऱ्या पाहत स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पर्यटन करत आहेत. तसेच पर्यटन करता करता पक्षांतर करून सुद्धा प्रत्येक पक्षातील लाभाची पदे उपभोगत आहेत. परंतु या नव्याने रुजू होत असलेल्या राजकीय संस्कृतीला छेद देत भारतीय शेतकरी कामगार पक्षाने आजही आपला लालबावटा डौलाने फडकत ठेवलेला आहे.  75 वर्ष होतील, एकच पक्ष, एकच रंग आणि महाराष्ट्राचा विकास हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ध्येयाने शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते काम करत आहेत याची आज पुन्हा एकदा पनवेलकरांना प्रचिती आली.

         शेतकरी कामगार पक्षाचा 75 वा वर्धापन दिन वडखळ येथे साजरा होत आहे. त्या ठिकाणी पनवेल शहरातून हजारो कार्यकर्ते वर्धापन दिन सोहळ्यासाठी जाणार आहेत. तेथे जाताना सामाजिक बांधिलकीतून पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, गुणे हॉस्पिटल, नीलाताई पटवर्धन रुग्णालय या ठिकाणी शेकाप नेते आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष  जे.एम म्हात्रे, पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब देशमुख , शेकाप नेते नारायण घरत ,पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे पनवेल महानगरपालिका, शेकाप तालुका चिटणीस राजेश केणी, जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्यासोबत इतर नेते आणि कार्यकर्ते यांनी सर्व रुग्णांना फळ वाटप केले.

        महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आपण सर्व पाहत आहात. अशा प्रसंगी शेकापच्या वर्धापन दिनाला  75 वर्षे होत आहेत. या निमित्ताने शेकापचा इतिहास खूप मोठा आहे त्यानुसारच याची ध्येय धोरणे मनाशी बाळगून भविष्यात सुदृढ आणि समृद्ध  पनवेल करण्यास आम्ही शेकापच्या लालबावट्या  खाली अजून जोमाने काम करू असे प्रतिपादन शेकापनेते आणि  विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोपर येथे जलकुंभाचे लोकार्पण