नवी मुंबईत मनविसे  विद्यार्थी युनिटची स्थापना

नवी मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 16 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वाशी, सीबीडी बेलापूर येथील महाविद्यालयात मनविसे कडून विद्यार्थी युनिटची स्थापना करण्यात आली. 

मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनविसेचे सरचिटणीस संदिप पाचंगे यांच्या हस्ते वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालय तसेच सीबीडी बेलापूर येथील भारती विद्यापीठ महाविद्यालय येथे मनविसे कडून विद्यार्थी युनिटचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी - विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद पहायला मिळाला.

 यावेळी मनसेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, मनसे महिला सेना शहर अध्यक्षा डॉ.आरती धुमाळ, उपशहर अध्यक्षा दिपाली ढऊल, मनविसे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, मनसे विभाग अध्यक्ष भूषण कोळी, सागर विचारे, योगेश शेटे, विक्रांत मालुसरे, मनविसे उपशहर अध्यक्ष निखिल गावडे, प्रशांत पाटेकर, दशरथ सुरवसे, मनविसे शहर सचिव समृद्ध भोपी, मनविसे विभाग अध्यक्ष विशाल भणगे उपस्थित होते. 

वाढीव फी, प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, व्यवस्थापन कोटा तसेच महाविद्यालयातील रॅगिंग, छेडछाडीचे प्रकार थांबिविण्यासाठी मनविसेकडून विद्यार्थी युनिटची स्थापना करण्यात आली असल्याचे मनविसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईत विविध ठिकाणी महाविद्यालयात टप्प्या टप्याने येत्या काही दिवसांत मनविसे कडून विद्यार्थी युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याचे संदेश डोंगरे यांच्याकडून सांगण्यात आले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना उत्तेजन देण्यासाठी अभिनव योजना