भाजप राज्यपालांच्या तोंडून हवे ते वदवून घेत आहे - विठ्ठल मोरे

नवी मुंबई -: आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपला जे बोलायचे आहे ते राज्यपालांच्या तोंडून भाजप वदवून घेत आहे असा आरोप नवी मुंबई शिवसेना  जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे.

गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. मुंबई ही आता देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी  केले होते,  याचा निषेध शिवसेनेच्या वतीने करण्यात आला त्यावेळी मोरे बोलत होते.

गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषत: मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. मुंबई ही आता देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले होते.आणि वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले आणि याविरोधात सेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला  आहे.

नवी मुंबई शिवसेने देखील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी एकत्रित येत निषेध आंदोलन केले. शिवसेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी सांगितले की मागे ही राज्यपालांनी सावित्री बाई फुले यांच्या बाबतीत वक्तव्य केले होते. आणि आता परत एकदा मराठी माणसाला कमी लेखण्याहेतू  हेतू वक्तव्य केले आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच भाजप असे वक्तव्य राज्यपालांच्या तोंडून वदवून घेत आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो. यावेळी शिवसैनिकांनी कोल्हापुरी चप्पल - धोतर दाखवत राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी माणसाचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्र सोडून निघून जावे अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली. यावेळी शहर प्रमुख विजय माने, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, काशिनाथ पवार, विभाग प्रमुख महेश कोटीवाले, समीर.बागवान, महिला जिल्हा संघटक  रंजना शिंत्रे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

श्रावणातील रानभाज्या पनवेलकरांच्या भेटीला