जाहिरात फलकांसाठी झाडांवर खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

 

नवी मुंबई ः रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर जाहिरात फलकांसाठी खिळे ठोकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संदर्भात ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. सदर मागणीचे निवेदन संदेश डोंगरे यांनी २९ जुलै रोजी महापालिका आयुवतांना दिले आहे. पोस्टर ला
 
वण्यासाठी मोकळी जागा नाही? झाड आहेच की बॅनर लावायला? बघा एखादा डेरेदार वृक्ष, ठोका झाडावर खिळे. या जाहिरातबाजीमुळे असंख्य ठिकाणी खिळे ठोकलेले वृक्ष जणू वेदनेने विव्हळत आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जाहिरात करण्यासाठी जागा नसल्याने प्रसंगी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचा वापर केला जात असल्याचे संदेश डोंगरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर जाहिरात फलकांसाठी खिळे, पत्रे ठोकणाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई करावी. तसेच झाडांवर जाहिरात फलकांसाठी ठोकण्यात आलेले खिळे, पिना, बांधण्यात आलेल्या तारा अशा झाडांच्या जीवावर बेतणाऱ्या गोष्टी काढून टाकाव्यात. झाडालाही मुक्त श्वास घेता यावा यासाठी महापालिकेने येत्या सात दिवसांत खिळे मुक्त झाड मोहिम राबवावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या वतीने संदेश डोंगरे यांनी सदर निवेदनातून आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे
केली आहे. अन्यथा ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या वतीने नवी मुंबई शहरातील पर्यावरण प्रेमी संघटनांना सोबत घेऊन झाडांना खिळेमुक्त करुन त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी प्रसंगी महापालिका विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही संदेश डोंगरे यांनी निवेदनातून दिला आहे.

बॅनर, पोस्टर घट्ट बसावा म्हणून चारही बाजुंनी झाडांवर खिळे ठोकले जातात. काही महाभाग तर पत्र्यावर जाहिरात करुन पत्राच झाडाला ठोकतात. झाडांवर ठोकलेले खिळे कालांतराने गंजतात. तो गंज झाडांच्या बुंध्यात उतरतो. त्याचा झाडांवर हळूहळू परिणाम होतो आणि झाड खंगत जाते. संदेश डोंगरे, अध्यक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नवी मुंबई.

 

 
 
Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

देशाची माफी मागून प्रायश्चित्त घ्याः महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील यांची मागणी