नवी मुंबई जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेला उत्साहात सुरूवात

नवी मुंबई  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा पारिषद, ठाणे यांच्या सहयोगाने ‘नवी मुंबई महानगरपालिका ‍जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2022-23’ चे आयोजन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने नेरुळ येथील कै. यशवंतराव चव्हाण क्रीडागंणातील फुटबॉल मैदानात दि. 25 जुलै ते दि.29 जुलै 2022 या कालावधीत करण्यात आलेले आहे.

      सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा ही 14 वर्षाआतील मुले व 17 वर्षाआतील मुले व मुली या वयोगटात होणार असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 40 हून अधिक शाळांनी सहभाग नोंदविलेला आहे. या स्पर्धेचा शुभारंभ 25 जुलै 2022 रोजी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या शुभहस्ते कै. यशंवतराव चव्हाण क्रीडांगण, सेक्टर-19, नेरुळ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानावर संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन कमिटीचे सदस्य  धनंजय वनमाळी, पुरूषोत्तम पुजारी, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व अभिलाषा म्हात्रे उपस्थित होते.

या स्पर्धा पुढील दोन आठवडे 14 वर्षाआतील मुले, 17 वर्षाआतील मुले व मुली या गटांमध्ये संपन्न होणार आहेत. या स्पर्धेमधील विजेते संघ मुंबई विभागीय स्तरावरील पुढील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. या स्पर्धेकरीता विविध शाळांमधील क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभिनंदन करीत स्पर्धेकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

रायफल शुटिंग खेळामध्ये नमुंमपा शाळांमधील विद्यार्थी चमकणार