राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेतील विद्यार्थाना   शैक्षणिक साहित्य वाटप 

खारघर : येथील  राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्याचे वाटप नवी मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकारी   करुणा यादव आणि संस्थेचे प्रभारी अधिकारी डॉ. रवी प्रकाश सिंह  यांच्या उपस्थितीत  82 बौद्धिक दिव्यांगजन विद्यार्थाना  शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी  करुणा यादव यांनी उपस्थित बौद्धिक दिव्यांग मुले व पालक याना मोलाचे मार्गदर्शन केले तर  रवी प्रकाश सिंह यांनी  मुलांना शैक्षणिक साहित्याचे महत्व आणि केंद्र शासनाच्या योजने बद्दल सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन ज्ञानेश्वर सावंत  यांनी केले. 
Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

वीर वाजेकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी कोर्स उद्घाटन