वीर वाजेकर महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी कोर्स उद्घाटन

उरण   :उरण फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर एक.एस.सी. महाविद्यालय फुंडे येथे  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाच्यावतीने स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी कोर्स उद्घाटन व स्पर्धा परीक्षांची तयारी कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून मा. भाऊसाहेब अंधारे (तहसीलदार उरण)  तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अजित चहाळ, पुणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार हे उपस्थित होते.

कार्यशाळेच्या  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरभाऊराव पाटील व वाजेकर शेठ यांचे प्रतिमापूजन संपन्न झाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना मा. भाऊसाहेब अंधारे (तहसीलदार उरण) यांनी त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरीत केले.त्याच प्रकारे विद्यार्थ्यांस शासकीय अधिकारी कसे होऊ शकतो या बदल मार्गदर्शन  केले .तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून  अजित चहाळ म्हणाले की, विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सातत्यपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी स्पर्धा परीक्षा ग्रंथ प्रदर्शन व विक्री निवेदन -  चंद्रकांत खराटे. यानी केले. कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रल्हाद पवार म्हणाले की, सातत्य आणि प्रयत्न हे दोन घटक विद्यार्थ्याने मध्यवर्ती ठेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे. यावेळी स्पर्धा परीक्षा ग्रंथ प्रदर्शन व विक्री निवेदन   श्री. चंद्रकांत खराटे यांनी केले.

 कार्यक्रमाची प्रस्तावना व  पाहुण्यांची ओळख स्पर्धा परीक्षा तयारी प्रमुख डॉ. संदीप घोडके यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रा. राम गोसावी यांनी मानले.

प्रा. रश्मी पूरके यानी सूत्रसंचलन केले. कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

कष्टकरीनगर शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप