शहरातील २५ अवैध स्कूल बसेसवर  कारवाई 

नवी मुंबई -: कोविड काळात दोन वर्ष बंद असलेल्या शाळा आता सुरू झाल्याने विद्यार्थी ने आण करणाऱ्या स्कूल बसेस देखील सुरू झाल्या आहेत. मात्र यातील बऱ्याच बसेस नियमांना बगल देत चालवल्या जात असल्यानं यावर कारवाईची मागणी होत होती.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अवैध विनापरवाना, नोंदणी, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणाऱ्या  २५ स्कूल बसेस वर वाशी आरटीओ मार्फत नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. 

   शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व परवानाधारक वाहतूकदारांनी स्कूल बस नियमावलीतील तरतूदीचे पालन करावे, विनापरवाना शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येऊ नये, अशा वाहन मालकांनी स्कूल बस नियमावलीची पुर्तता करुन विद्यार्थी वाहतूकीचे परवाने घ्यावेत. असे आवाहन आर टी ओ मार्फत करण्यात आले आहे. तर याबाबत नुकतीच मनपा शिक्षण विभाग आणि वाशी आर टी ओ अधिकाऱ्यांमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. तर अशा वाहनावर कारवाईसाठी मागणी होत होती. त्यामुळे वाशी आरटीओ मार्गात स्कूल बस चालकांचा वाहन परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, चालकाचा  परवाना बॅच यांची तपासणी करण्यात आली. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या २५ स्कूल बस चालकांवर कारवाई केली असून १लाख  ७५ हजार रुपये दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.

शालेय वाहन चालकांना नियम पूर्ततेसाठी  शनिवारी आणि रविवारी ही आरटीओनी सुविधा उपलब्ध करून दिले आहे. अशी माहिती  परिवहन विभागाने दिली आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ