महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी वृक्ष संवर्धन योजना

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना आगळीवेगळी आदरांजली

पनवेल : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी लाखो लोकांना जगण्याची चांगली शिकवण दिली. आपल्या श्री बैठकीच्या माध्यमातून अनेकांचे उध्वस्त संसार त्यांनी पुन्हा  बसवले. समाजाला जगण्याची चांगली दिशा दाखवली. आपल्या निसर्गाच्या आवडीतून त्यांनी लाखो झाडे लावून ती वाढवण्याची आणि लोकांमध्ये निसर्गाबद्दल जनजागृती करण्याची त्यांनी शिकवण दिली.

     त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून प्रितम जनार्दन म्हात्रे अध्यक्ष असलेल्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या शिक्षण संकुलामध्ये "आदरणीय तीर्थरूप महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी वृक्ष संवर्धन योजना" सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये लहान मुलांना निसर्गाबद्दल ओढ निर्माण व्हावी या नानासाहेबांच्या शिकवणीतून त्या मुलांच्या वाढदिवशी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भेट म्हणून एक छोटे रोपटे देण्यात येणार आहे. हे रोपटे त्या विद्यार्थ्यांनी घराजवळ परिसरात लावायचे आणि त्याचे संगोपन करायचे. वार्षिक परीक्षेच्या वेळी सदर झाडाचा फोटो शाळेमध्ये देऊन छोटे रोपटे लागवड करून त्याच संगोपन केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांना शाळेकडून काही गुण देण्यात येतील जेणेकरून त्या मिळणाऱ्या गुणासाठी वर्षभर त्या छोट्याशा रोपट्याचे संगोपन केले जाईल आणि त्या लहान मुलांमध्ये निसर्गाबद्दल जवळीक निर्माण होईल हीच महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना आपल्या सर्वांतर्फे आदरांजली असेल.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नेरुळची ऐश्वर्या एम. फार्मा प्रथम वर्ष परिक्षेत अव्वल