नेरुळची ऐश्वर्या एम. फार्मा प्रथम वर्ष परिक्षेत अव्वल

 ऐेश्वर्याचे धवल  यश

नवी मुंबई ः सानपाडा येथील ओरिएन्टल कॉलेज ऑफ फार्मसीच्या पहिल्या वर्ष परिक्षेत नेरुळच्या ऐश्वर्या अशोक कुचमवार हिने कॉलेज तसेच मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा पराक्रम केला आहे. ९ जुलै रोजी हा निकाल जाहिर करण्यात आला.

पनवेलच्या सेंट विल्फ्रेड  कॉलेज ऑफ फार्मसी येथून बी फार्म करत असताना सर्वच्या सर्व आठ सेमिस्टरमध्ये प्रथम आलेल्या ऐेश्वर्याचा स्टुडन्ट ऑफ द ईयर हा किताब देऊन सन्मान करण्यात आला होता. सातत्याने नऊ सेमिस्टरमध्ये अव्वल शैक्षणिक यश मिळवणाऱ्या ऐश्वर्या हिला आषाढी एकादशीस नेरुळ येथे युथ कौन्सिल-नेरुळ, गजानन महाराज भक्त मंडळ-वाशी आणि आर सी एफ-हरित चेंबूर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वृक्षपूजन कार्यक्रम प्रसंगी सन्मानित करण्यात आले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने नेरे भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप