निवडणूकीसाठी इच्छुक असलेल्या तीन व्यक्तीचे नावे तयार ठेवा- आर सी घरत 

आर सी घरत यांच्या बैठकीत  केवळ पंचवीस काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित 

खारघर :  पालिकेच्या प्रभाग दोन  मध्ये निवडणूकीसाठी  इच्छुक असलेल्या तीन व्यक्तीची नावे तयार ठेवा अशी सूचना काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आर सी घरत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना बैठकीत दिली. बैठकीला काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर. सी घरत, मालिनाथ गायकवाड, हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे, बबन केणी,  तळोजा शहर अध्यक्ष विजय केणी, तेजस केणी, अंकुश गायकवाड अनुपमा सिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यात होणार आहे, त्यामुळे सर्वच पक्षाचे पदाधिकारी प्रभाग निहाय आढावा बैठका घेत पालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये तळोजा गाव, पापडीचापाडा, पेठाली, भोईरपाडा, तळोजे मजकूर, करवले, तुर्भेगाव आणि तळोजा फेज एक आदी वसाहतीचा समावेश आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नेहमी प्रमाणे जनसेवेची कामे सुरू ठेवावे. त्यात येणाऱ्या निवडणुकीत एका प्रभाग तीन उमेदवार असणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची नावे घ्यावे तसेच येणारी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून अथवा काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढविली जावू शकते, असेही घरत यांनी यावेळी सांगितले. यावेळी बबन केणी यांनी प्रभाग दोन मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविले जाईल असे सांगितले. या बैठकीला तळोजा परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे