महाविकास आघाडी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावी आनंदोस्तव

वी मुंबई : गेल्या वर्षभरापासून बहुचर्चित असलेला येथील स्थानिक भूमिपुत्रांची जोरदार मागणी असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास अखेर महाविकास आघाडी सरकारने सामोपचाराची भूमिका घेत भूमिपुत्रांचे भाग्यविधाते दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नांव देण्याचे मान्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री  सन्मा. उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत काल झालेल्या बैठकीत लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या ऐतिहासिक निर्णयामुळे भूमिपुत्रांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आज दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या जासई जन्मगावी पेढे वाटून व फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. दि. बा. पाटील साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साहेबांच्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडला.

या आनंद सोहळ्याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, माजी आमदार मनोहर भोईर, कॉंग्रेस नेते डॉ. मनीष पाटील, प. ता. कॉं. अध्यक्ष नंदराज मुंगाजी, उ. ता. कॉं. अध्यक्ष विनोद म्हात्रे, प. ता. कॉं. कार्याध्यक्ष श्री. अभिजित पाटील, रा. कॉं. प्र. सरचिटणीस  सुदाम पाटील, आघाडीतील सर्व पदाधिकारी, परिसरातील दि. बा. पाटील साहेबांचे चाहते तसेच जासई गावातील शेकडो महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 41 प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द