संत निरंकारी मिशनमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभर साजरा

      नवी मुंबई : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादांनी संत निरंकारी मिशन मार्फत यावर्षी मानवतेला समर्पित आंतरराष्ट्रीय योग दिवसचे आयोजन दिनांक 21 जून, 2022 रोजी संपूर्ण भारतवर्षातील विविध क्षेत्रांमध्ये करण्यात आले. यासाठी स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी सत्संग भवनांमध्ये, मोकळ्या जागांवर तसेच उद्यानांमध्ये ही योग शिबिरे आयोजित करण्यात आली.

      नवी मुंबईत ऐरोली ते पनवेल तसेच उरण परिसरात एकंदर १४ योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये साठे नगर-दिघा, ऐरोली सेक्टर-१, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, शिरवणे, नेरुळ, खारघर, नावडा गांव, कामोठे, कळंबोली, पनवेल, उरण व विधणे आदि ठिकाणांचा समावेश होता. याशिवाय बृहन्मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापुर आदि भागांमध्ये जवळपास ५३ ठिकाणी सुबह या योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला.

      सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अनेकदा आपल्या विचारांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच आपल्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याची प्रेरणा देत असतात. या योग दिवसाचा उद्देशही हाच आहे, की सर्वांमध्ये एकाग्रता आणि सामुदायिक सामंजस्याच्या भावनेचा संचार व्हावा, ज्यायोगे हे जीवन आणखी सुंदर व उत्तम रीतीने जगता येईल. वर्तमान समयाला तनावपूर्ण व नकारात्मक विचारांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडत आहे. अशा वेळी ईश्वराने जे हे अनमोल मनुष्य तन आपल्याला दिलेले आहे त्याचा सांभाळ योगाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानेंद्रियांना जागृत करुन आध्यात्मिकतेने युक्त जीवन जगून करायला हवा.    

      योग ही प्राचीन भारतीय परंपरेची अमूल्य देणगी आहे. मन आणि शरीर यांच्या समन्वयाचे ते प्रतीक आहे. योग हा केवळ व्यायाम नाही तर तो सकारात्मक भावना जागृत करुन तनावमुक्त जीवन जगण्याची प्रेरणास्रोत आहे.  योगाद्वारे आपली जीवनशैली सहज व सक्रिय करुन स्वस्थ जीवन जगता येते. वर्तमान काळात तनावमुक्त जीवन जगण्यासाठी योगाची नितांत गरज आहे. आज ही संस्कृती संपूर्ण विश्वातील जवळपास सर्व देशांकडून अंगीकारली जात आहे.

      मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून सन २०१५ पासूनच योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे आयोजन संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात करण्यात आले.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शिक्षकांअभावी भरते अवघी ३ तासांची शाळा