शिक्षकांअभावी भरते अवघी ३ तासांची शाळा

नवी मुंबई -: दर्जेदार शिक्षण देत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत वर्षांगणीक  पटसंख्या वाढत आहे.अशातच महापालिकेने सुरू केलेल्या सी बी एस ई शाळांना देखील भरघोस प्रतिसाद वाढला आहे.मात्र कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळा क्रमांक ९४ विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या  अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुरेपूर शिक्षण देण्यास महापालिका कमजोर पडत असल्याचे समोर येत असून एकूण १२३६ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार अवघे आठ  शिक्षक वाहत आहेत.

त्यामुळे या शाळेत शिक्षक संख्येत वाढ करावी  अशी मागणी आता पालकांकडून होत आहे.

नवी मुंबई महनगरपालिकेच्या वतीने सी बी एस ई शाळा सुरू केल्यानंतर मागील काही वर्षात या शाळांना प्रचंड प्रतिसाद लाभला असल्याने बहुतांशी पालक आपल्या मुलांना महापालिकेच्या या सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्यास पसंती देत असल्याने दिवसेंदिवस याची पट संख्या वाढत आहे. त्यामुळे  पालिकेने यंदा शहरात आणखी दोन शाळा सुरू केल्या आहेत. मात्र शाळांना भरघोस प्रतिसाद पाहता विद्यार्थ्याना शिकवण्यासाठी शिक्षकांची संख्या अपुरी पडत असल्याचे चित्र सद्या कोपरखैरणेतील शाळा क्रमांक ९४ मध्ये.दिसून येत आहे

या शाळेत एकूण १२३६ विद्यार्थांच्या. शिक्षणाची जबाबदारी  केवळ ८ शिक्षक आणि ४ मदतीनस यांच्यावर देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिकच्या १६ तुकड्या असून ५७६ विद्यार्थ्यांना ३ शिक्षक आणि ४ मदतनीस तर प्राथमिकच्या १७ तुकड्या असून ६६० विद्यार्थ्यांकरिता ५ शिक्षक शिकवीत आहेत. एकंदरीत १२३६ विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ ८ शिक्षक पेलत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.त्यामुळे या शाळेत शिक्षक संख्येत वाढ करावी  अशी मागणी आता पालकांकडून होत आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न