सिद्धार्थ हायस्कूल ,खारघर  १० वी विद्यार्थ्यांच्या १०० % निकालाची उज्वल परंपरा कायम ! 

 नवी मुंबई  खारघर :-  खारघर नवी मुंबई येथील सिद्धार्थ मल्टिपरपज  रेसिडेन्सल हायस्कूल १०  वी चा निकाल १००% लागला आहे. गेली २०  वर्षाची शत प्रतिशत यशाची परंपरा एप्रिल २०२२ च्या परीक्षेत कायम ठेवल्याबद्दल सिद्धार्थ मल्टिपरपज रेसिडेन्शन हायस्कूल खारघर चे संचालक डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी गुणवंत विद्यार्थी सानिया समीन शेख (८३टक्के ) अमर पाटील ( ८०टक्के ) ,आशा कोरे ( ८७टक्के ), रेणू राव ( ७६ टक्के ), सोनाक्षी वाघमारे  ( ७६ टक्के )आदीं यशश्री विद्यार्थ्यांना  भारताचे संविधान आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले .आर्थिक दृष्टीने  दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे संस्कार करून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करून पालकांचा दृष्टिकोन बदलण्यास कारणीभूत असलेल्या शिक्षकांचा सन्मान ही संचालक प्रा डॉ जी के डोंगरगावकर यांनी केला . यावेळी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या बिजनेस असोसिएट प्रमुख रत्नमाला डोंगरगावकर, मुख्याध्यापक एम एल सूर्यवंशी यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील भावी  यशाकरिता शुभेच्छा दिल्या .

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

संत निरंकारी मिशनमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभर साजरा