पनवेल तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.६१ टक्के

पनवेल  : पनवेल तालुक्याचा दहावीचा निकाल ऑनलाईन १७ जून रोजी जाहीर झाला. पनवेल तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.६१ टक्के लागल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची (SSC result) आतुरता लागली होती तो निकाल आज (१७ जून) जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद घेत या निकालाची घोषणा केली. या मध्ये पनवेल तालुक्यातील ११५८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून ६०६५ मुले उत्तीर्ण झाली तर ५५२३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील जवळपास ८८ विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सिकेटी विद्यालय १००%, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल १००%, न्यू इंग्लिश स्कूल १००%, नेरे हायस्कुल १००%, नॅशनल उर्दू हायस्कुल १००%, के.पाटील माध्यमिक विद्यालय १००%, महाराष्ट्र स्कूल १००%, मोरू नारायण म्हात्रे स्कूल १००%, बार्न्स स्कूल १००% आदी नामांकित शाळांनी आपला १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

इयत्ता दहावीच्या निकालासंदर्भात हेल्पलाईन सेवा सुरु