इयत्ता दहावीच्या निकालासंदर्भात हेल्पलाईन सेवा सुरु

 

ठाणे :- मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. निकालासंदर्भात विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालये यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळाने दूरध्वनी क्रमांक 022-27893756/27881075 ही हेल्पलाईन सुरु केली आहे. ही हेल्पलाईन दि. 17 जून 2022 रोजी दुपारी 01.00 वाजल्यापासून ते दि. 24 जून 2022 पर्यंत कार्यान्वित राहील.

        हेल्पलाईनच्या वेळा पुढीलप्रमाणे राहतील दि. 17 जून 2022  रोजी दुपारी 01.00 ते सायंकाळी 8.00 पर्यंत व दि. 18 जून 2022 ते दि. 24 जून 2022 पर्यंत सकाळी 08.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत राहिल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 98.12 टक्के