वाशीतील के.बी.पी.कॉलेजमध्ये एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण शिबीर

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेचे वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबीर (सीएटीसी) व थल सैनिक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 5 ते 14 जून दरम्यान भरविण्यात आलेल्या या शिबीरामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील 414 प्रशिक्षणार्थी तसेच मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध एन.सी.सी. बटालियनचे 30 सैनिक स्टाफ सहभागी झाले होते. 

करोना काळात विद्यार्थ्यांसाठी एन.सी.सी.चे ऑनलाईन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते. त्यानंतर वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज येथे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्याना व्यक्तिमत्वविकास, शस्त्र प्रशिक्षण, अडथळे, नकाशा वाचन, आयोग्य स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, मैदानी आणि युद्धकलेचे सखोल सैद्धांतिक आणि व्यवहारिक ज्ञान आदिंची माहिती देण्यात आली. कॅम्प कमाडंट, कर्नल तुषार जोशी (सेनामेडल) यांनी राष्ट्र उभारणीत एन.सी.सी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगतानाच शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एन.सी.सी मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. 

यावेळी लेफ्टनंट कर्नल सुनील झुत्शी, रवी सामल आणि त्यांच्या सहाय्यक एनसीसी अधिकारी, जेसीओ, स्थायी प्रशिक्षक कर्मचारी, यांच्या शस्त्रास्त्रs, आपत्ती व्यवस्थापन, शारीरिकसक्षमता, सामाजिक, सामुदायिक व सांस्कृतिक विकासाचे प्रशिक्षण देत अविरत देश सेवेचा निर्धार व्यक्त केला. या शिबिराचे आयोजन प्रा.डॉ.शुभदा नायक व त्यांची टीमने केले होते.  

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पनवेल तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.६१ टक्के